शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या दुहेरी दराबाबत केंद्राची चाचपणी--कारखान्यांच्या फायद्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:28 IST

कोल्हापूर : घरगुती व व्यवसायासाठी लागणाºया साखरेचे दर वेगवेगळे करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे.

ठळक मुद्देदेशातील साखर उद्योगसाखर उत्पादन - २६५ लाख टनवापर - २५० लाख टन घरगुती वापर - ७५ लाख टन (३० टक्के)उद्योगासाठी - १७५ लाख टन (७० टक्के)

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : घरगुती व व्यवसायासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वेगवेगळे करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर चाचपणी सुरू आहे. राष्ट्रीय साखर कारखाना फेडरेशनच्या मागणीवर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सकारात्मक असून, त्यांनी हे दोन दर कसे असावेत व दोन ग्राहक कसे ठरविता येतील, याबाबतची माहिती फेडरेशनकडे मागितली आहे.

साखर जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असल्याने तिच्या दरावर सरकारचे नियंत्रण असते. साखरेचे दर ठराविक किमतीच्या वर जाऊ दिले जात नाहीत. एकीकडे ऊसदरासाठी ‘एफआरपी’चा कायदा केला; पण साखरेचे दर अस्थिर राहिल्याने कारखानदार अडचणीत येतात. एफआरपीप्रमाणे दर देताना कारखानदारांची दमछाक उडते. यातून राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या चिमण्या कायमच्या थंडावल्या. कारखानदारी वाचविण्यासाठी साखरेला ‘जीवनाश्यक वस्तू कायद्या’तून काढून तिचे दोन दर ठरविण्याची मागणी अनेक वर्षे केली जात आहे.

याबाबत ‘इस्मा’ व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या वतीने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे मागणी केली होती. व्यक्तिगत (घरगुती) वापर व उद्योगासाठी साखरेचे दर वेगवेगळे ठरविण्यासाठी फेडरेशनने २२ डिसेंबर २०१७ रोजी केंद्राकडे मागणी केली. त्यावर केंद्र गांभीर्याने विचार करीत आहे. घरगुती व उद्योग असे ग्राहक कसे निवडावेत व दोन दर कसे असावेत, याबाबत आपल्या स्तरावरून अधिक माहिती देण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव जितेंद्र जुएल यांनी नुकतीच केली आहे.मिठाईमध्ये दुप्पट कमाईसाधारणत: एक किलो मिठाईसाठी ४०० ग्रॅम साखर लागते. म्हणजे १६ रुपयांच्या साखरेवर ४०० रुपये किलोने मिठाई विकली जाते. त्यामुळे मिठाईसाठी सवलतीच्या दरातील साखर का? असा शेतकरी संघटनांचा सवाल आहे. 

 

नवव्या ऊस परिषदेत दुहेरी दराची मागणी केली होती. केंद्राच्या हालचालींचे स्वागत आहे; पण खाण्याच्या साखरकोट्याचा गैरवापर सरकार कसे टाळणार हे महत्त्वाचे आहे.- खा. राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना)